संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा कायम काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. नव्याने तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय नारायण फटांगरे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर कोपरगाव ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी नितीन राव मनोहर शिंदे यांची आणि भिंगारच्या तालुकाध्यक्षपदी रिजवान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली अजय फटांगरे यांनी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळताना तालुक्यात युवकांचे मोठे संघटन उभे केले होते. याचबरोबर गोटा गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापतीपद त्यांनी सांभाळले.
बोटा गटामध्ये गावोगावी सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या. तालुक्यातही त्यांचा जनसंपर्क कायम चांगला राहिला. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली 26 जून 2025 रोजी झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत त्यांना देण्यात आले. त्यांच्या समवेतच कोपरगाव ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी नितीन मनोहर शिंदे यांची तर भिंगारच्या अध्यक्षपदी रिजवान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मा आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, सौ दुर्गाताई तांबे,युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, बाजीराव पा खेमनर, ॲड माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, संपतराव डोंगरे सुधाकर जोशी ,शंकरराव पा खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, पांडुरंग पा. घुले, बाबासाहेब ओहोळ, मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे ,विश्वासराव मुर्तडक, निखिल पापडेजा, सुरेश झावरे सौ अर्चनाताई बालोडे, सौ प्रमिला अभंग, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, गौरव डोंगरे , हैदर अली, जावेद शेख, यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
काँग्रेसचा विचार तरुणांमध्ये पोहोचवण्यासाठी अधिक काम – अजय फटांगरे
महाराष्ट्राचे लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर कायम विश्वास ठेवला असून मोठी संधी दिली आहे. आपण अत्यंत प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पडणार असून काँग्रेस हा राज्यघटना व देशहिताचा विचार आहे. युवक या विचारापासून काही दुरावले असून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून काँग्रेसला अधिक बळकट करण्यासाठी यापुढील काळामध्ये माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्रियतेने जोमाने काम करून तालुक्यात व जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांकावर नेऊ अशी भावना नवनियुक्त अध्यक्ष अजय फटांगरे यांनी व्यक्त केली आहे याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे.