28.3 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

अहिल्यानगरमध्ये अघोरी विद्या,करणी,जादूटोण्याचा प्रकार बागडपट्टीतील कुटुंबीय झाले भयभीत

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगरमध्ये बागडपट्टी येथील महेश सुभाष पेद्राम यांच्या दुकानासमोर रात्री अघोरी विद्या,करणी,जादूटोण्याचा प्रकार घडला असून त्याचे कुटुंबीय यामुळे भयभीत झाले आहे त्यांनी आज पोलीस स्टेशनला अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .

अर्जामध्ये त्यांनी म्हटले आहे अमन शिवकुमार श्रीमल याचेवर अगोरी विदया करणे, करणी करणे, जादुटोणा करणे २०१३ कलम ३ व ४ व इतर प्रमाणे गुन्हा दाखल करणेस विनंती आहे आपणास विनंती पुर्वक अर्ज करतो की, माझे दाजीचे श्रीनीवास कोंडयाल यांचे जावई अमन श्रीमल यांचेवर मंगळवारी तोफखाना पो.स्टे.ला अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा राग येऊन श्रीमल याने काल दिनांक २ रोजी रात्री ११.५० ते १२.१५ वा. वेळेस श्रीमल याने माझे घरासमोरील माझे टेलरीगचे दुकान फॅशन मेकर्स लेडीज टेलर्स या ठिकाणी येऊन त्याने त्याचे खिशामध्ये एका पिवशवीमध्ये अंड, लिंबु. काळी भाऊली, सुपारी, लिबु, हळकुंड, मिरची असे टाकुन व अंडयावर माझे नांव, माझे बायकोचे नांव निलीमा माझे मुलीचे नांव आरोही असे टाकुन अगोरी विदया करुन, पुजा करुन करणी करुन जादूटोना करुन पूजा केली व ते झालेवर तेथून निघुन गेला

मी आज सकाळी दुकान उघडण्यासाठी गेलो असता तेव्हा हे सर्व दुकानासमोर पडलेले असल्याचे दिसले त्यावरुन आम्ही माझ्या सर्व घरच्यांनी दुकानांचे वरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले तेव्हा आम्हास आमचे दाजीचे जावई अमन याने अगोरी विदया केली व पूजा करुन करणी करुन जादुटोना केली आहे. आम्ही सर्व आमचे घरचे लोक घाबरले आहेत, आम्ही श्रीमल अमन यास ओळखले असून त्याचे फेसबुक वरील फोटो पाहिले व फुटेज मधील फोटो व त्याचे उंची व केसाची हेअर स्टाईल, देहबोली याचंवरुन श्रीमल अमन यानेच अगोरी विदया व जादुटोना केले आहे.

अमन श्रीमल याचेपासून आमचे सर्व कुटुंबाला घराला व आमचे दाजीला माझे भाचीला व तिचे मुलीला याअगोदर जिवे ठार मारण्याचे धमकी दिली आहे व त्यावर या अगोदरही त्याचेवर तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. अमन श्रीमल याचेवर तात्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई व्हावी ही विनंती अर्जांसाबोत सीसीटीव्ही फुटेजचे फोटो व पुरावा ओळखण्यासाठी श्रीमल अमनचे फेसबुक वरील फोटो जोडले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!