कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-आषाढी एकादशीनिमित्त बालगोकुलम अकॅडमी कोल्हार बु. या शाळेतील बालगोपालांनी दरवर्षीप्रमाणे श्रीहरी पांडुरंग, रुक्मिणी, वारकरी यांचा पेहराव करून टाळ मृदुंगाच्या गजरात विठुनामाचा जयघोष करत बालगोकुलम शाळा ते भगवती माता मंदिर, विठ्ठल मंदिर या मार्गावर पायी दिंडी पांडुरंगाचा नामस्मरण करत काढली.
कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच सुरेंद्र खर्डे पाटील व भगवतीपुरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे पाटील, शिवधन फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित मोरे , बालगोकुलम अकॅडमीचे संस्थापक प्रा. सोन्याबापू मोरे, प्राचार्य, सौ. शारदा मोरे व इतर पालक प्रतिनिधी यांच्याहस्ते पांडुरंग रुक्मिणी रूपातील बालगोपालचे हार घालून स्वागत करण्यात येऊन , श्री विठ्ठलाची आरती मान्यवरांचे हस्ते करण्यात आली.
दिंडीच्या स्वागतासाठी आलेल्या मान्यवरांनी बालगोपालांचे दिंडीचे स्वागत व कौतुक करून आषाढी एकादशी निम्मित उपस्थित सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
“विठ्ठलनाम घेऊ या, शिक्षणात प्रगती करू या!” ,”नामस्मरणाची सवय लावू, संस्कारांची शिदोरी बांधू!” “शिकून होऊ या ज्ञानी, आणि विठ्ठलाचे भक्त सजग व स्वाभिमानी!” “पंढरीचा वास, विद्यार्थ्यांमध्ये भक्तीचा विद्यार्थ्यांनी मंदिरासमोर प्रांगणात रिंगण सोहळा घेऊन उपस्थितांना दाखवून दिला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी व आपल्या बालगोपालांचे कौतुक करून संस्काराची शिदोरी देण्यासाठी बहुसंख्येने पालकवर्ग व नागरिक उपस्थित होते.