शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):,-आषाढी वारी हा जगाच्या पाठीवरील एक अदभूत सोहळा असून, शेकडो किलोमीटरचे अंंतर चालून पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरात येेणाऱ्या लाखो भाविकांसाठी सुखाचा क्षण असल्याची भावना जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्री विखे पाटील यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमिताने श्री विठ्ठलाचे आणि रूक्मीणीचे पहाटे दर्शन दरवर्षी आषाढी एकादशीला पांडूरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी विखे पाटील कुटुंबिय पंढरपूरात जातात.पद्मश्रीं डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पासून सुरू असलेली परंपरा मंत्री विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांनी पुढे सुरू ठेवली आहे.
मनोभावे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की आषाढी वारीचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे.
वारीच्या मंगलमयी पर्वाच्या निमिताने शेकडो किलोमीटरचे अंंतर चालून पंढरपूरात लाखो भाविकांचे पांडूरंगाच्या श्रध्देपोटी येणे म्हणजे जगाच्या पाठीवरील एक अदभूत सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले.
शेकडो वर्षांची परंपरा या वारीला आहे.राज्याच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा आत्मा म्हणून वारकरी सांप्रदायाने वारीचे महत्व अधोरेखीत करून ठेवली आहे.
श्री.विठ्ठलाच्या समोर नतमस्तक होण्याचे भाग्य मिळणे म्हणजे परमोच्च असा सुखाचा क्षण असतो.प्रत्येकजण यासाठीच पंढरीत येण्यासाठी आसुलेला असतो.सर्व दुख विसरून माउलीच्या दर्शनातच सुखाचा क्षण लाखो भक्त शोधत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
पंढरपूर येथे लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या भक्त निवासात जावून मंत्री विखे पाटील यांनी भक्त निवसात उतरलेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेवून व्यवस्थेची पाहाणी केली.सर्वच दिंड्यामधील वारकरी बांधवांनी मंत्री विखे पाटील यांचे स्वागत केले.