अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), कानपूर व एस.आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप (ADIP) योजनांतर्गत जिल्ह्यातील तालुका निहाय अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप शिबिराचे आयोजन दि. 7 ते 21 जुलै 2025 या कालावधीपर्यत सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात आलेले आहे.
या शिबिराअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या शिबिराचे उद्घाटन दि. 7 रोजी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथे पार पडले. या कार्यक्रमास मा. श्री. प्रशांत गायकवाड, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, डॉ. अभिजित दिवटे, संचालक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, श्री. एस. एस. चुमले, एलिम्को, डॉ. रुपेश जाधव, संचालक, एस.आर. ट्रस्ट, डॉ. दिपक अनाप व डॉ. अभिजित मेरेकर प्रकल्प समन्वयक व जिल्हा समाज कल्याण विभाग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रास्तविक भाषणात डॉ. दिपक अनाप यांनी सांगितले की दिव्यांग योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठी मा. डॉ. सुजय विखे पाटील, अध्यक्ष, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांचा नेहमीच पुढाकार असतो. या अगोदर ही प्रत्येक योजनेत जिल्हा प्रथम स्थानावर राहिला आहे आणि याही योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना लाभ मिळेल अशी अशा व्यक्त केली.
मा. श्री. प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की दिव्यांग सक्षमीकरण विभाग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नेहमीच एकत्र काम करून दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करेल.
या शिबिरा अंतर्गत एकूण 53 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकूण 53 लाभार्थ्यांना तात्काळ कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स चे वाटप अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
सर्व दिव्यांग बांधवांनी तात्काळ कृत्रिम अवयव मिळ्याल्याबद्ल डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग विभागाचे आभार मानले.
यापुढील प्रत्येक तालुक्यातील होणाऱ्या शिबिरांचा लाभ पात्र दिव्यांग व्यक्तींना घ्यावा असे आव्हान जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचे संचालक डॉ. अभिजित दिवटे यांनी केले आहे.