लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-दि. 8 जुलै 2025 रोजी प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये 17वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुधी धामणे हिने केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शाळेचा माजी विद्यार्थी बांधकाम व्यावसायिक श्री. शुभम जोंधळे उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष 2024-25 दहावीच्या वर्गातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी जीवनात शाळेचा फार मोलाचा वाटा असतो हे प्रकर्षाने सांगितले आणि शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. नंतर विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सीईओ डॉ. सुस्मिता विखे पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य, उप प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. तन्वी चौधरी हिने केले.