मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या कृतीवर विधानपरिषदेत विरोधकांनी आक्षेप घेतला. तसेच यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचे आदेश दिले आहेत.
विधानपरिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार निवासात काही घाण असेल किंवा चुकीच्या काही गोष्टी असतील तर स्वतंत्रपणे त्यावर कारवाई करावी. पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे चुकीचे आहे. त्यांनी जे केले ते चुकीचेच आहे. यामुळे आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये जाते. निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि यावर जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी
.