23.8 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

चैन स्नॅचिंगमधील आरोपीकडून १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठणसह १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील चैन स्नॅचिंगमधील सराईत आरोपीकडून १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठणसह १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई श्रीरामपूर शहर पोलिसांची पार पाडली.

दि. ६ जुलै रोजी सरस्वती कॉलनी येथील फिर्यादी मिना विजय वावळे (वय ४२) या त्यांच्या घरी जात असताना डॉ. मिनाताई जगधने यांच्या घराजवळ वॉर्ड नं.०७ येथे त्यांच्या पाठीमागून काळया रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने झटापट करुन, फिर्यादीला मारहाण करुन हिसकावले व पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जावून, पाहणी केली. त्याचवेळी गुप्त बातमीदाकडून दोन इसम हे गायकवाड मराठी शाळा, वॉर्ड नं.०१ येथे बसलेले असल्याची माहीती मिळाली. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना नावे विचारली असता त्यांनी शाहरुख ऊर्फ चपट्या अफरस शेख (वय ३२, रा. जिनींग प्रेस, बस स्टॅण्डच्या मागे, वॉर्ड नं. ०६), ज्ञानेश्वर ऊर्फ पेटी संताराम मोरे (वय २१, रा.इंदिरानगर वॉर्ड नं.०१) असे सांगितले. त्यांच्या अंगावरील कपडे व शरीरयष्टी वरुन फिर्यादीने दिलेले वर्णन मॅच होत असल्याने त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदरचा गुन्हा नमुद आरोर्षीनी केला असल्याची पोलीस पथकाची खात्री झाली.

त्यांना ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी नमुद गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून नमुद गुन्ह्यातील ८० हजार रुपये किंमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्यांचे मिनी गंठण, १ लाख रुपयाची टी. व्ही.एस. कंपनीची रायडर मोटारसायकल असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पीलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोहे, प्रदिप साठे, अमोल पडोळे, संभाजी खरात. मच्छिंद्र कातखडे, अजित पटार, सचिन काकडे, सागर बनसोडे, आजिनाथ आंधळे आदींनी पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!