श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- शहरात २१०० किलो गोवंशीय जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस व हत्यारासह एकूण १० लाख २१ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. करण्यात आला, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने पार पाडली.
दि. ११ जुलै रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना शहरातील बिस्मिल्लानगर पाटाच्या कडेला, वॉर्ड नं. ०२ येथील मोसीन ऊर्फ बूंदी इसाक कुरेशी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच जैनब मस्जिद जवळ, अहिल्यादेवीनगर बंजरंग चौक वॉर्ड नं.०२ येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जनावराची कत्तल होत आहे. व कत्तल केलेले मांस विक्रीसाठी घेवून जाणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ तपास पथकास दोन्ही ठिकाणी
जावून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ दोन्ही ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी पाच इसम कत्तल केलेले गोवंशीय जनावराच्या मांसाचे छोटे छोटे तुकडे करुन वाहनामध्ये भरताना व कत्तल करण्यासाठी वापरलेल्या हत्यारासह मिळून आले. याप्रकरणी मोसीन ऊर्फ बूंदी इसाक कुरेशी (वय ३५, रा. वार्ड नं.०२), शोएब सलीम कुरेशी (वय ३०, रा. सुभेदार वस्ती वार्ड नं. ०२), अरबाज अस्लम शहा (वय २३, सुभेदार वस्ती), रिजवान युसूफ कुरेशी (वय ३६, रा. कुरेशी मोहल्ला), अमजद युनूस कुरेशी (वय ४४, कुरेशी मोहल्ला) त्यांना ताब्यात घेण्यात आले. १० लाख २१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमला जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस निरिक्षक पुढाल नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.