अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्ह्यात यावर्षी खरीपाची पेरणी १६ लाख ३५५ हेक्टर क्षेञावर झालेली आहे. म्हणजे जवळपास ८३% क्षेञावर आतापर्यंत खरीपाची पेरणी शेतकर्यांनी केली आहे.
जिल्ह्यात या वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने सर्वदुर चांगल्या प्रमाणात हजेरी लावली.त्या मुळे शेतकर्यांनी आपली खरीपाची पेरणी ऊरकुन घेतली.सोयाबीन,कापुस,मूग,तुर,भात ई.पिकांची पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात सर्वदुर मे महीण्यात तसेच जुन महिन्याच्या सुरवातीला समाधान कारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी खरीपाच्या पिकांची पेरणी करण्यास व्यस्त होते. जिल्ह्यात सर्वात जास्त क्षेञावर १ लाख ५६ हजार २५५ हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे.
काही तालुक्यात २-३ महसुल मंडळे सोडुन तालुक्यात सर्वञ पाऊस चांगला झालेला आहे.दिनांक ७,८ व ९ रोजी पिकाला आधार देणारा पाऊस झाला आहे.भात पिकाची पेरणी अकोले व संगमनेर तालुक्यात साधारणत:३३%झालेली आहे. जिल्ह्यातील तालुक्यात बाजरी,मका,तूर,मूग,ऊडीद,भुईमूग,सोयाबीन ,कापूस ई.पिकांची पेरणी सर्वञ झालेली आहे.तसेच काही ठिकाणी फळबाग लागवड झालेली आहे.पिकांना समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांवर सध्या तरी दुबार पेरणीचे संकट समाधानकारक पावसामुळे ओढावले नाही.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी स्थानिक पातळीवर गावातील शेतकर्यांची भेट घेऊन संबधीत पिकावर परिस्थितीनुसार पिकांबद्दल माहीती देऊन फवारणी व निगा राखण्याची माहीती देतात.
हवामान बदलामुळे सध्या ढगाळ वातावरण राहीले तर पिकांवर किड व रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येतो.तर ऊन पिकास पोषक असल्यामुळेकिड व रोगांचे प्रमाण कमी स्वरुपात दिसुन येते.वेळोवेळी तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी ,ऊप कृषी षी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी संबधीत महसुल मंडळातील शेतकर्यांना पिकाबद्दल माहीती देऊन शेतकर्यांच्या करतात.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा त्वरित करून घ्यावा. ३१ जुलै पर्यंत विमा नोंदणीसाठी मुदत आहे. पीक विमा नोंदणी करताना अग्रिस्तक न. व ए पीक पाहणी बंधनकारक केली आहे. तसेच पीक कंपनी प्रयोग व तांत्रिक उत्पादनाच्या आधारे विमा भारिप[याची रक्कम निश्चित होणार आहे.
सुधाकर बोराळे
(जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर).
खरीप पिकासाठी पीक विमा शेतकरी हिस्सा ( प्रति हेक्टर ) (शेतकरी हिस्सा )
सोयाबीन :- ११६० रु. प्रति हेक्टरी
कापूस :- १८०० रु.
मूग :- ५१५ रु.
तूर :- ९४० रु.
भात :- १५२. ५० रु.
फळपिके ( प्रति हेक्टर ) (शेतकरी हिस्सा )
डाळिंब :- ८००० रु.,
सीताफळ :- ३५०० रु.