लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-कडधान्याची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाच्या अवलंब करून कडधान्यांमध्ये आपण सक्षम होण्याची उत्पादकता वाढावी. यासाठी राष्ट्रीय कडधान्य अभियान हे महत्त्वपूर्ण ठरत असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अनेक योजना सुरू आहेत या योजनेचा लाभ घेत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनेतून शेतकऱ्यांनी पुढे जावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
कडधान्य उत्पादकता वाढीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या राष्ट्रीय कडधान्य अभियान अंतर्गत राहाता कृषी अधिकारी आणि सिंधुताई शेतकरी महिला प्रोड्युसर कंपनी यांच्या सहकार्याने राहाता तालुक्यात तुर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. महिला शेतकऱ्यांना तुर बियाणाचे वितरण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संवाद साधतांना सौ.विखे पाटील बोलत होत्या. यावेळी राहाता तालुक्यातील विविध गावांतील लाभर्थी महिला उपस्थित होत्या.
यावेळी संवाद साधताना सौ. विखे पाटील म्हणाल्या की राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहता आणि सिंधुताई सिंधुताई महिला शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून तूर पिकाची उत्पादकता वाढीसाठी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन कंपनीच्या माध्यमातून देत असतानाच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुरीची ही खरेदी कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या पिकापासून चांगले उत्पादन घ्यावे असे आवाहन करत आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना या शेतकरीभिमुख ठरत आहे. या योजना प्रत्येक महिला शेतकऱ्यांनी समजून घेत या योजनेचा अवलंब करून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करावे. शेती क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. यासाठी कंपनीच्या माध्यमातून देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत.यावेळी राहाता तालुक्यातील २२ गावांतील ३५ महिला शेतक-यांना या प्रात्यक्षिकांचा लाभ देण्यात आला.