राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांचा युनेस्को ने जागतिक वारसा यादीमध्ये केलेला समावेश म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी गौरवास्पद व अभिमानाची बाब आहे सर्व भारतीयांसाठी हा आनंदोत्सवाचा सुवर्ण क्षण आहे जागतिक वारसा यादीत गड किल्ल्यांची नोंद झाल्याबद्दल राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व भारतीय जनता पार्टीचे राहता तालुका मंडल अध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर व उपस्थितांनी एकमेकांना पेढे भरवून मोठा जल्लोष साजरा केला
याप्रसंगी भाजपाचे राहाता तालुका मंडलाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसांच्या यादीमध्ये समावेश केल्याची महाराष्ट्रातील नागरिक व शिवप्रेमींना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले तसेच ऐतिहासिक व प्राचीन पुरातन मंदिरे आणि वास्तू संवर्धनासाठी डॉ सुजय विखे पाटील नेहमी शासन दरबारी विशेष प्रयत्न करतात त्याकरिता विविध उपक्रम राबवतात गड किल्ले म्हणजे इतिहासाचा व संस्कृतीचा मोठा ठेवा हा ठेवा भावी पिढीसाठी जपणे गरजेचे आहे ही महत्त्वकांक्षा बाळगून आमचे मार्गदर्शक डॉ सुजय विखे पाटील कार्यरत असतात गड किल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केल्याने गड किल्ल्यांचा वारसा जपण्याचे डॉ सुजय विखे पाटील यांचे स्वप्न व व्हिजन खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे याचा सुद्धा डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह आम्हा सर्वांना विशेष आनंद झाला असल्याचे डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले
रविवारी सकाळी विरभद्र मंदिरासमोरील वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे जेष्ठ व्यापारी प्रदीपशेठ चुग, पंचकृष्णा डेअरीचे संचालक तथा उद्योजक सुनील सदाफळ आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला .
यावेळी वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय सदाफळ,शिवसेना तालुकाप्रमुख सागर बोठे, विविध कार्यकरी सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर सदाफळ, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे साहेबराव निधाने,भाजपा तालुकाउपाध्यक्ष संतोष बोरकर,भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष चेतन रनमाळे,सर्जेराव मते, हेमंत सदाफळ, प्रवीण सदाफळ,हरिदास गायकवाड,अक्षय बोठे, प्रसाद शिवरकर सतीश मोठे, दिलीप मंडलिक अशोक गुडगिले अमोल बनकर, पप्पु खरात, प्रणित भालेराव आदी उपस्थित होते.
विविध देशांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या जागतिक संघटना युनेस्कोने महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी,लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी तसेच तामिळनाडू येथील जिंजी आदी किल्यांचा वारसा यादीत समावेश केला आहे ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने मोठी आनंदाची बाब आहे आता प्रत्येक नागरिकांनी तसेच शाळा महाविद्यालयांनी विविध संघटनांनी या जागतिक वारसा बनलेल्या गड किल्ले अर्थात ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन हा जागतिक वारसा भारतीय साठी व भावी पिढीसाठी शौर्याचा संस्काराचा संस्कृतीचा इतिहासाचा ठेवा व दीपस्तंभ आहे याचा अनुभव घ्यावा
सुनील सदाफळ
उद्योजक – पंचकृष्णा डेअरी