23.4 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

गाव पातळीवरील सार्वजनीक प्रश्नासाठी अधिकारी ग्रामस्थ यांनी एकत्रित बसून मार्ग काढा- ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-गाव पातळीवरील सार्वजनीक प्रश्नासाठी अधिकारी ग्रामस्थ यांनी एकत्रित बसून मार्ग काढावा.व्यक्तिगत प्रश्नासाठी कार्यालयातून पाठपुरावा होईलच परंतू शासकीय कार्यालयात नागरीकांची अडवणूक होणार नाही या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक अर्जावर कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री ना.विखे पाटील यांचा जनता दरबार प्रवरानगर येथील डॉ धनंजय गाडगीळ सभगृहात आयोजित करण्यात आला होता.तबब्ल सहा तासाहून अधिक काळ चाललेल्या जनता दरबारात जिल्ह्यासह राज्यातील लोकांनी येवून आपल्या प्रश्नाची निवेदन सादर केली.प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत मंत्री विखे पाटील यांनी आलेल्या प्रत्येक अर्जावर वेळतच कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकार्याना दिल्या.

मंत्री विखे पाटील यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने अनेक गावांची शिष्टमंडळ होती.या शिष्टमंडळाने सार्वजनीक रस्ते, तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी,वाहतूकीसाठी पूल गावातील अतिक्रमण आशा प्रश्नाबाबत दिलेल्या प्रत्येक निवेदनावर अधिकारी ग्रामस्थ यांनी एकत्रित बसून मार्ग काढावा.विकास कामासाठी योग्य आरखडा तयार करा.निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही आशी ग्वाही त्यांनी मंत्री विखे पाटील यांनी दिली.

यंदा आवर्तनाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन चांगल्या पध्दतीने झाल्याबद्दल अनेक ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार मानले.पावसाचे प्रमाण कमी असले तरी आवर्तनाची मोठी मदत शेतकऱ्यांना झाली.भविष्यातही गरज लक्षात घेऊन निळवंडे धरणातून दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना विभागाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय योजनांच्या अमंलबजावणी करीता प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहीजे.जलजीवन योजनांच्या बाबतीत आलेल्या तक्रारी संदर्भात अधिकाऱ्यांनीच गावात जावून योजनूतील त्रृटी दूर कराव्यात आशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी संबधित विभागाला दिल्या.

मंत्री विखे पाटील यांच्या जनता दरबार येत्या १५जुलै २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दुपारी २वाजता आयोजित करण्यात आला आहे.राज्यातील नागरीकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पक्षीय स्तरावर प्रत्येक मंत्र्याचे जनता दरबार आयोजित करण्यात येत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!