23.4 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

विजेच्या बाबतीत श्रीरामपूर समृद्ध होणार – आ. हेमंत ओगले २२०/३३ के. व्हि वीज उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न 

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे सुमारे ५९ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या २२०/३३ के. व्हि उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

यावेळी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, सद्यस्थितीत श्रीरामपूर तालुक्याला बाभळेश्वर आणि नेवासा तालुक्यातून वीज पुरवठा होतो त्यामुळे शेतकरी व नागरिकांना उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात अनेक ठिकाणचे ट्रांसफार्मर वारंवार ओव्हरलोड होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला होता या वीज उपकेंद्रामुळे ती अडचण देखील दूर होणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसी येथे नव्याने उद्योगधंदे येण्यास मदत होईल जेणेकरून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

२२०/३३ के. व्हि उपकेंद्राच्या निर्मितीमुळे श्रीरामपूर विजेच्या बाबतीत समृद्ध होणार असून येणाऱ्या काळात श्रीरामपूर महावितरण कार्यालयाचे विभाजन करून बेलापूर उपकेंद्र मंजूर करावे तसेच महावितरणकडे रिक्त असलेल्या जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.

आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून मी विधानसभेमध्ये श्रीरामपूर विज केंद्राचा प्रश्न लावून धरला. सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील भूमिपूजन अभावी वीज केंद्राचे काम प्रलंबित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर लगेचच कार्यवाही होऊन आज सदर विज केंद्राचा शुभारंभ संपन्न होत आहे. निश्चितच त्याचा फायदा मतदारसंघाला होणार असल्याचे ते म्हटले.

राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे देखील आमदार ओगले यांनी आभार मानले आहे.

यावेळी युवा नेते करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रितेश रोटे, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, कांतीशेठ पटेल, मुन्ना पठाण, सरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, सुनील शिरसाठ, संदीप मगर, प्रवीण नवले, के. सी शेळके, अरुण मंडलिक, सुनील साबळे, अशोक जगधने , दिपक वमने, सरबतजितसिंग चुग, संजय गोसावी, नवाज जहागीरदार, मिथुन शेळके, गणेश काते, बाबा वायदंडे, सुरेश ठूबे, रितेश चव्हाणके, के.के. खंडागळे, निलेश लबडे, सनी मंडलिक, सुनिल जगताप, विशाल साळवे, कल्पेश पाटणी यांच्यासह आदी उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासा आराखड्यात शिर्डी – वाकडी- श्रीरामपूर – बेलापूर मार्गे शनिशिंगणापूर रस्त्याचा समावेश करावा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!