अकोले(जनता आवाज वृत्तसेवा):-अकोले तालुक्यातील कोतुळ मध्ये तब्बल ऐक कोटींच्या गुटक्यावरती धडक कारवाई करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यामधील कोतुळ येथे हा गुटखा पकडण्यात आला असून, पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याचं गोडाऊन करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी गोडाऊन मधून गुटका गाड्यांमध्ये टाकून गावोगावी पोच केला जात होता. पोलीस अधीक्षक संतोश खाडे यांनागुप्त बातमीदारा मार्फतही माहीती समजताच छापा टाकत तब्बल १२ आरोंपींना ताब्यात घेतले आहे.
नव्याने रुजू झालेले परिविक्षाधीन संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली आहे. गुन्हा नोंद करण्याची कामे चालू आहेत.