लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-लोणी खुर्द गावामध्ये चिकन, मटन मार्केटसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि जनसेवा मंडळाच्यावतीने पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
काही दिवसांपुर्वी लोणी खुर्द गावामध्ये चिकन विक्रीचा व्यवसाय करणा-या व्यवसायिका कडून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्रित येवून या विरोधात ग्रामपंचायत तसेच पोलिस प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. सकल हिंदु समाजाच्या वतीने भव्य मोर्चाही काढून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी श्रीकिसन आहेर, डॉ.सुनिल आहेर, सुधिर आहेर, सचिन आहेर, राहुल घोगरे, साहेबराव आहेर, सुहास घोगरे, किरण दत्तात्रय आहेर, विजय मापारी, जालिंदर आहेर, बंटी घोगरे, सुधाकर आहेर, मनोज लोखंडे, अमोल तुपे, संदिप घोगरे, किरण किसन आहेर, संजय आहेर, प्रतिक कदम, अनिल जाधव, संदिप आहेर, जालिंदर मापारी, मुन्ना ब्राम्हणे, योगेश आहेर आदिंचा या शिष्टमंडळात समावेश होता.
ग्रामस्थांनी आणि जनसेवा मंडळाच्या युवक कार्यकर्त्यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून त्यांना या गंभिर समस्येची माहीती देवून, संबधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली. याबरोबरीनेच लोणी खुर्द गावामध्ये चिकन, मटन मार्केटसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन द्यावी, तसेच हा व्यवसाय करणा-या व्यवसायिकांना नियमांचे बंधन घालण्याबाबतचे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.