लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जलतरण संघटनेमार्फत पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल लोणी या ठिकाणी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय जलतरण निवड चाचणीमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या नऊ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जलतरण पुणे बालेवाडी येथील स्पर्धेसाठी निवड झाली. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे यांनी दिली.
दि १२ जुलै २०२५ रोजी आयोजित जिल्हास्तरीय जलतरण निवड चाचणीमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या एकूण दहा विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांची पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या १९ जुलै ते २१ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. निवड झालेल्या यशस्वी स्पर्धकांमध्ये बारावीतील अर्कम शेख व सहावीतील उमेर शेख या बंधूंनी विशेष कामगिरी बजावली. तर अमोल पवार, कौस्तुभ चिवटे, प्रयागराज पवार, साईराम जाधव,अनुज वाबळे, सम्राट उगले, रितेश घोडके इत्यादी स्पर्धकांनी जलतरणाच्या वेगवेगळ्या प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले.
स्पर्धकांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनीही विशेष कौतुक केले.
प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी व क्रीडा संचालक रमेश दळे व जलतरण प्रशिक्षिका सौ योगिता तनपुरे तसेच इतर क्रीडा शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.