संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यात असणाऱ्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करावे ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे तसेच नगरपालिकेच्या कुटीर रुग्णालयात स्त्री रुग्णालय सुरू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांकडे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले असता महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यास राज्य शासन सकारात्मक असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाशअबिटकर यांनी सांगितले.
मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात सार्वजनिक आरोग्य मंत्री. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आ . अमोल खताळ आणि आ. विठ्ठलराव लंघे आदींसह सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संगमनेर नगरपालिका परिसरातील कॉटेज हॉस्पिटलमध्ये १०० बेडचे सर्व अत्याधुनिक सविधानयुक्त स्त्री रुग्णालय मंजूर करण्यात यावे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर व्हावे तर चंदनापुरी धांदरफळ खुर्दआणि तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे, संगमनेर नगरपरिषद हद्दीतील खासगी रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत परवानगी देण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींबद्दल. तसेच इतर ही आरोग्यविषयक महत्वाच्या गोष्टीवरती साधकबाधक चर्चा करण्यात आली.
संगमनेरच्या आरोग्य सुविधा बळकट व्हाव्यात आणि नागरिकांना दर्जेदार उपचार सेवा मिळाव्यात, आरोग्याच्या लढाईत कोणीही दुर्लक्षित राहू नये या साठी माझा प्रयत्न आहे. लवकरच या सर्व मागण्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या मागण्यांवर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मकता दाखवली आहे. या बैठकीत आरोग्य सेवा विभागआयुक्त श्रीमती.कादंबरी बलकवडे आरोग्य संचालक डॉ.विजय कंदेवाड. रुग्णालय सहाय्यक संचालक सुनीता गोल्हाइत वित्त अधिकारी डॉ.तुलसीदास सोळंके नाशिकचे आरोग्य उपसंचालक न डॉ. कपिल आहेर, अहिल्यानगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे आदी अधिकारी उपस्थित होते.