वाकडी(जनता आवाज वृत्तसेवा):-मतदार संघाव्यतिरिक्त गरजेच्या ठिकाणी व सार्वजनिक कामांना विखे कुटुंबाने नेहमीच प्राधान्य दिले आहे यापुढेही जीवात जीव आहे तो पर्यंत विखे कुटुंब लोकप्रतिनिधीत्वातून व जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून मतदार संघ व्यतिरिक्त विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे वक्तव्य अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटिल यांनी राहाता तालुक्यातील वाकडी येथील विविध विकास कामाच्या उदघाटनप्रसंगी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता बाजार समितीच्या संचालिका रंजना बापूसाहेब लहारे होत्या.
पुढे बोलताना सौ शालिनीताई विखे म्हणाल्या कि शासनाचा निधी हा पुन्हा पुन्हा एकाच कामास येत नाही सर्व विकास कामे हे योग्य पद्धतीने झाले पाहिजे अशी सूचना शालिनीताई विखे पाटिल यांनी ठेकेदारांना दिल्या यावेळी सौ विखे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य दवाखान्याची संपूर्ण पाहणी करून दुरुस्ती साठी निधी उपलब्ध होणे कामी प्रयत्न करणार असल्याचे सांगत योग्य निधी भेटल्यास नवीन भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार असल्याचे देखील सांगितले वाकडी गावासाठी जलजीवन योजना 27 कोटी रुपयाची असून त्यात वापरत येणारी मटेरियल लोकप्रतिनिधीनी योग्य आहे कि नाही ते तपासले पाहिजे अश्या योजना पुन्हा येणार नाही ना . विखे साहेबांच्या माध्यमातून निळवंडे गोदावरी कालव्यातून पाणी शेवटच्या शेतकऱ्यांना मिळले आहे खा सुजय दादांनी बचत गटाच्या माध्यमातून खेडेपाड्यात योग्य कामे केली आहे गावातील विकास कामे करताना मंदिराबरोबर शाळा व आरोग्य याकडे पण लक्ष दिले पाहिजे वयक्तिक कामाबरोबर सार्वजनिक कामांना महत्व द्या गावातील गट तट आता बाजूला ठेवा असे आवाहन देखील सौ शालिनीताई विखे पाटिल यांनी लोकप्रतिनिधीना केले बचत गटातील महिलांना विविध उपक्रम जनसेवा फॉउंडेशन कडून पुरविल्या जात आहे टाकाऊ पासून दिकाऊ पदार्थ असे उपक्रम जनसेवा फौंडेशन कडून चांगल्या प्रकारे राबविले जात आहे महिला बचत गटांनी याचा अवश्य लाभ घावा असे यावेळी सौ विखे यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे राहाता बाजार समिती माजी संचालक बापूसाहेब लहारे,विवेक गुंड गटविकास अधिकारी पं स राहाता मयूर मुनोत उपाभियंता पं स राहाता ग्रामविकास अधिकारी मडके, कामगार तलाठी निलेश वाघ,राहाता बाजार समिती संचालिका रंजना लहारे, जि प सदस्या कविता लहारे, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच रोहिणी आहेर, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ स्वाती बच्छाव माजी प स सदस्य विकी कापसे, माजी लोकनियुक्त सरपंच डॉ संपतराव शेळके, गणेश कारखान्याचे माजी संचालक ॲड. भाऊसाहेब शेळके, सुरेश जाधव अभय शेळके, संदिप लहारे अमित आहेर राजाभाऊ कापसे, शोभा घोरपडे,अण्णासाहेब कोते, अनिल कोते, रमेश लहारे, सुनीता कासार,ज्योतीताई लहारे, अनिता कापसे, संदीपानंद लहारे, गोरक्षनाथ कोते,बाबासाहेब शेळके, पोपट लहारे, जालिंदर लांडे, सुनील कुरकुटे, पोलीस पाटिल मच्छिन्द्र अभंग,बाळासाहेब आहेर भीमाशंकर लोखंडे, साहेबराव आदमाने आदिसह ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पोपट लहारे यांनी मानले.