लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेतील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या २५ विद्यार्थ्यांनी भरघोस बक्षीस मिळवून आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा स्केचिंग, कलरिंग, हॅन्डरायटिंग व टॅटू मेकिंग या प्रकारात घेण्यात आली होती.
यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या एकूण ५७ विद्यार्थ्यांनी आपल्या सहभाग नोंदवला व त्यातील २५ विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यात स्केचिंग २, कलरिंग १८, हॅन्ड रायटिंग ४, व टॅटू मेकिंग १ अशा २५ बक्षिसांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनीही विशेष कौतुक केले.
प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी व कलाशिक्षक संजय तुपे व प्रज्वल भगत या सर्वांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.