लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण आहे.या अध्यात्माच्या अधिष्ठानामागे समाजाने उभ्या केलेल्या शक्तीमध्येच सप्ताहाचे यश असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
गुरूवर्य गंगागिरीजी महाराजांच्या १७८ व्या हरीनाम सप्ताहाचे आयोजन वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे करण्यात आले आहे.सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी खा.संदिपान भुमरे,आ.रमेश बोरनारे सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष महंत हरीशरण गिरीजी महाराज माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर भानूदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रभाकर शिंदे, दिपक पठारे ,अविनाश गलांडे यांच्यासह नासिक अहील्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,या सप्ताहाच्या परंपरेची वाटचाल द्विशताब्दीकडे सुरू आहे.जगाच्या पाठीवर अध्यात्मिक क्षेत्रातील या सोहळ्याने अनेक विक्रम केले.केवळ ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत भक्ती रसामध्ये एकरुप होणारी समाजशक्ती हेच या सप्ताहाचे यश असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाकआहे. सप्ताहाची परंपरा ही सनातन हिंदु धर्म संस्कृती आणि परंपराना पाठबळ देते.महंत रामगिरीजी महाराज हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या विरोधात ठाम भूमिका घेवून जेव्हा बोलतात तेव्हा समाजाने सुध्दा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली पाहीजे.
आज हिंदू धर्माला जाणीवपुर्वक बदनाम करण्याचे काम होत आहे.आशा परीस्थितीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारे सप्ताहाचे सोहळे हिंदू धर्माच्या संघटित करणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यंदाचा सप्ताह ऐतिहासिक होण्याकरीता प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे.परमार्थाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी प्रत्येकाने एक पाउल पुढे टाकण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील यांनी शनिदेवगाव गावाला जोडणार्या सर्व रस्त्यांचै काम सप्ताह सुरू होण्यापुर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून,शनिदेवगाव उच्च पातळी बंधार्याच्या कामास आपण मंजूरी दिली आहे.यासाठी लागाणारा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून बंधार्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला जातानाच मंत्री विखे पाटील पुलाच्या कामाची पाहाणी करून कठड्याचे काम पूर्ण आदेश दिले.
याप्रसंगी आ.रमेश बोरनारे यांनी तीन जिल्ह्यांच्या सीमेवर होणारा सप्ताह वैजापूर तालुक्यात घेण्याचे भाग्य मिळाले असून मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने पुलावरील रस्ता आणि संरक्षण कठड्याचे काम मार्गी लागले असल्याचे सांगितले.या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महंत रामगिरीजी महाराज यांनी गंगागिरीजी महाराजांनी शनिदेवगाव येथे सप्ताह घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यावर्षी पूर्ण होत असल्याचे सांगून सप्ताहाला सहकार्य करणार्या देणगीदारांची नाव जाहीर केली.