spot_img
spot_img

पुणतांबा साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारने मंजूरी जिल्ह्याच्या विकासाला यामाध्यमातून नवी दिशा मिळेल-ना. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-पुणतांबा साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या निर्णयाचे जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत करून लाखो भाविकांसाठी तसेच जिल्ह्याच्या विकासाला यामाध्यमातून नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव दुहेरी यांच्या सहकार्याने मंजूर झालेला मार्गाचा प्रकल्प २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फाॅर मल्टी ट्रॅकींगचा एक भाग असून प्रकल्पाच्या माध्यमातून प्रमुख विभागांमध्ये रेल्वे क्षमता वाढवणे असा आहे.

पुणतांबा साईनगर शिर्डी रेल्वे प्रकल्पाच्या जवळील अहील्यानगर,पुणतांबे ,शिर्डी आणि नासिक रोड मार्गे नासिक पुणे या नविन मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम सध्या विभागाने सुरू केलेले काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी २३९ .८० कोटीचा खर्च असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

प्रस्तावित मार्ग एक रेल्वे मार्ग म्हणून विकसित करण्यावर रेल्वे विभागाने भर दिला आहे.केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पुणतांबा साईनगर शिर्डी मार्गाच्या दुहेरीकरणामुळे या मार्गाची वापर क्षमता ७९टक्क्यांपर्यत वाढेल.

पुणतांबा साईनगर शिर्डी मार्गावर अनेक रेल्वे धावत आहे. नव्या प्रस्तावित मार्गाने या मार्गला रेल्वेची अधिक जोडणी सुलभ होईल असै स्पष्ट करून शिर्डी मध्ये येणारे लाखो साईभक्त नियमित प्रवासी शेतकरी विद्यार्थी व्यापारी यांना मोठा लाभ होईल.

जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णय स्वागतार्ह असून जिल्ह्याच्या विकासाचा नवा मार्ग यातून साकार होईल.यापुर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळ समृध्दी महामार्गाने जिल्ह्याच्या विकासाला पाठबळ दिले.मंजूर केलेल्या नव्या रेल्वे मार्गाचा मोठा आधार विकास प्रक्रीयेला मिळेल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!