लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-मुलींनो शिक्षणातून पुढे जातांना खूप मोठे व्हा परंतु आई-वडिलांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका प्रवरेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाबरोबरच मुलींना सक्षम करण्यात प्रवरा ही कायमच अव्वल स्थानावर राहिले आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू आहे या उपक्रमातून महिलांनी सक्षम व्हावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महिला सक्षमीकरण कक्ष अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित महिला सबलिकरण आणि सक्षमीकरण कार्यशाळेत सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ साहित्य डाॅ. संजय कळमकर, संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. आर. ए . पवार,उपप्राचार्य डॉ. शांताराम चौधरी, डॉ, अनिल वाबळे, डाॅ.छाया गलांडे,समन्वयक डाॅ.कल्पना पलघडमल आदींसह विद्यार्थिनी आणि महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या प्रवरेच्या माध्यमातून शिक्षण देत असतांना मुलींच्या शिक्षणावरती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी विशेष भर दिला हेच काम मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील मुली या शिक्षणातून सक्षमपणे उभ्या राहत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलींनी विविध क्षेत्रात आपले योगदान हे दिले आहे. प्रवरेच्या मुली या आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.
यावेळी डॉ. संजय कळमकर म्हणाले मुलींच्या शिक्षणात आज प्रवरा अव्वल स्थानावर आहे. प्रवरेने मुलींच्या शिक्षणावरती विशेष भर देत असताना या ठिकाणी सुरक्षित शिक्षण मुलींना मिळत आहे. मुलींनो सक्षम व्हा तंत्रज्ञानाचा वापर जरूर करा परंतु या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि आपले संस्कार विसरू नका संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम करा. शाळेच्या आठवणींना उजाळा देत असताना संस्कारावरती त्यांनी विशेष मार्गदर्शन करतानाच आई-वडिलांचा त्याग लक्षात घेऊन मुलींनी आदर्श शिक्षण घेत सुंदर जीवन जगावे आपले सुख दुसऱ्याच्या दु:खाचे कारण ठरू नये असे शिक्षण घ्या. आई-वडील दुःखी होणार नाही याची काळजी घ्या आपले सक्षमीकरण होताना आई-वडिलांचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्या जगाला दिशा देण्याचं काम महिलांनी केले आहे. भूतकाळ विसरू नका. संस्कारासाठी जुने ग्रंथ संत समजून घ्या असे असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकांमध्ये डॉ. आर.ए. पवार यांनी महिला सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणामध्ये प्रवरेच्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैशाली मुरादे आणि डाॅ. हर्षल खर्डे यांनी तर आभार डॉ.कल्पना पलघडमल यांनी केले. यावेळी शासकिय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सन्मानही मान्यवरांनी केल्या.
मुलींच्या शिक्षणामध्ये प्रवराही मुलींना गरुड झेप आणि ध्येय साध्य करण्याचे शिक्षण देते. या माध्यमातून प्रवरेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी या उच्चपदावर पोहोचले आहे. प्रवरेचा आदर्श घेत असतांना नुकताच प्रवरेमध्ये संपन्न झालेला वारी पंढरीची …ज्ञानगंगा प्रवरेची हा उपक्रम खऱ्या अर्थाने संस्कृती आणि संस्कार देणारा असाच ठरला असे गौरव उद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी काढत यांचे नियोजन करणाऱ्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील यांचे विशेष कौतुक त्यांनी केले.