कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-रविवार दि. 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील मानाची निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आषाढी एकादशीनंतर पंढरपूरहून परतीच्या वारीत श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथे भगवती माता मंदिरामध्ये आगमन होताच पालखीचे कोल्हारकर ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
दरम्यान यावेळी 300 वारकऱ्यांसह पालखीसोबत मोहन महाराज बेलापुरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज गोसावी, नवनाथ महाराज गांगुर्डे उपस्थित होते.कोल्हार चे ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब अंभोरे,कैलास वर्पे,सुभाष शिंगवी, सुधीर चोरडिया,भाऊ भणगे यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे हार फुले वाहून पूजन केले.
तसेच यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी सोबत असणाऱ्या सुमारे 300 वारकऱ्यांसह ग्रामस्थ भाविक भक्तांना अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले. कोल्हार येथे थांबण्याचे पालखीचे यंदाचे हे 21वे वर्ष होते. दि. 27 जुलै रोजी पालखी त्र्यंबकेश्वर येथे तिच्या मुळस्थानी दाखल होणार आहे.
याप्रसंगी कोल्हार येथील उद्योजक सुरेश राका, संतोष राका, निलेश शिंगवी,गणेश राका,काजु राका, अतुल अंभोरे,बापु कुंभकर्ण,रमेश खर्डे, साहेबराव गाडे, मधुकर राजभोज यांसोबत भाविक भक्त ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.