शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा) :-येथील साई आश्रया अनाथालयाचे संस्थापक गणेश दळवी यांचा २० वर्षीय मुलगा शिवम गणेश दळवी याचा पिंपळवाडी येथील तळ्याचे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने शिर्डीत हळहळ व्यक्त होत आहे.
शिर्डी जवळील पिंपळवाडी गावातील ग्रामपंचायतचे पाण्याचे तळ्याचे परिसरात शिवम हा पायी फिरायला जात असायचा नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी पायी फिरायला गेला असता हात व पाय धुण्यासाठी तळ्याजवळ गेला असता त्याचा पाय घसरून तो तळ्यात पडला सदरची घटना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ शिर्डी पोलिसांची संपर्क साधला पोलिसांनी तात्काळ शिर्डी व राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे व राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या सूचनेवरून शिर्डी व राहाता येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पिंपळवाडी ग्रामपंचायत तळ्यामध्ये पडलेल्या शिवम् दळवीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तळ्यातून शिवमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
शिर्डीत या घटनेची माहिती समजतात नागरिकांनी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे धाव घेत अनाथांचा नाथ असलेला गणेश दळवी पोरका झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त करत या दुर्दैवी झालेल्या घटनेचे अनेकांनी हळहळ व्यक्त केले.