नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा): – मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू असताना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सिंचन झाले पाहिजे. यासाठी पाणी व्यवस्थित वापरणे व त्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी अधिकार्यांबरोबर शेतकऱ्यांनी देखील घ्यावी अशी सुचना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केली.
मुळा पाटबंधारे विभागाच्या चिलेखनवाडी उपविभागाअंतर्गत कुकाणा सिंचन शाखा क्रमांक २ च्या नूतन कार्यालयीन इमारतीचे लोकार्पण आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी आ.लंघे बोलत होते.मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, सचिन देसरडा,अब्दुल शेख,अंकुश काळे,डॉ. बाळासाहेब कोलते, दिनकरराव गर्जे,अमोल अभंग, सोमनाथ कचरे,विलास देशमुख,शंकर भारस्कर,घोडेगाव उपविभागाचे उपविभागीय अभियंता संदीप पवार, व्यासपीठावर उपस्थित होते.
आ.लंघे पुढे म्हणाले की,मुळा पाटबंधारे विभागाच्या परिपूर्ण कार्यालयाचे लोकार्पण आज झाले. आपण बघतो की मुळा पाटबंधारे कर्मचाऱ्यांच्या वसाहती फार जुन्या होऊन त्यांची दुर्दशा झालेली आहे, जे अधिकारी काम करतात त्यांना कार्यालय देखील व्यवस्थित नव्हते. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार रामकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुकणा व शिरसगाव येथे कार्यालये बांधण्यात आली.कुकणा येथील कार्यालय अतिशय सुसज्ज,छोटे पण माहितीने परिपूर्ण आहे. कार्यालयात लावलेल्या माहिती फलकामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळेल.
पूर्वी थेट सिंचन होत होते,परंतु पाणी वापर संस्था चालु झाल्यानंतर काही अडचणी आल्या. येत असलेल्या अडचणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी चर्चा झालेली आहे. यात सुसूत्रता कशी आणता येईल यावर भर देण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मागचे तीनही रोटेशन व्यवस्थित घेता आले.
कार्यकारी अभियंता सायली पाटील व त्यांच्या टीमने अतिशय चांगले नियोजन केले. अधिवेशन काळात जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना रोटेशन सोडण्याबाबद विनंती केली त्यांनी दुसऱ्याच दिवशी रोटेशन सुरू करण्याचे आदेश दिले मुळा उजवा कालव्याचे ११० कोटींचे हेड टू टेल लाईनिंगचं काम लवकरच सुरू होणार आहे,हे काम पूर्ण झाल्यावर होणारे लॉसेस कमी होऊन पूर्ण दाबाने पाणी मिळेल.तीन ही आवर्तनात पंधरा दिवस पाणी लवकर सोडल्यामुळे निश्चितपणाने त्याचा फायदा आमच्या शेतकरी बांधवांना झाल्याने ते समाधानी आहेत. अगोदर टेल कडे जास्त दाबाने पाणी काढलं आणि ती भरणे लवकर पुर्ण झाली तर खालची वेटिंग थांबेल यासाठी सर्वांनी स्टाफने लक्ष घालावं आणि आपली जीवन वाहिनी असलेल्या मुळा धरणाचा फायदा शेतकऱ्यांना मिळून द्यावा.
भविष्य काळामध्ये तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांची पिके पाण्यावाचून जळू नयेत याची दक्षता लोकप्रतिनिधी म्हणून नक्की घेईल. धरणात खूप पाणी आहे परंतु नियोजन होत नव्हते,मधेच कुठे तरी पाट फुटायचा आता तसे होणार नाही.
मात्र संस्थांनी-शेतकऱ्यांनी पाणी मागणी केली पाहिजे.कर्मचारी काम करतात त्यांना पण सहकार्य केलं पाहिजे.मशिनरी व डिझेल देऊन नादुरुस्त चाऱ्या दुरुस्ती करण्यासाठी पालक मंत्र्यांशी बोलून मार्ग काढू. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू माणून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचंय असे ही आ.लंघे म्हणाले.
पाणी वापर संस्था प्रशिक्षक जलमित्र सुखदेव फुलारी, कुकाणाचे माजी सरपंच एकनाथराव कावरे,दौलतराव देशमुख, भाऊसाहेब फोलाणे, बाळासाहेब कचरे,ललित भंडारी,लहू खाटीक, बाळासाहेब म्हसरूप, अशोक भुमकर, शाखाधिकारी बिरबल दरवडे, जितेंद्र कावले, प्रदीप खर्से,अतुल गायकवाड, कालवा निरीक्षक श्रीकांत करंजे, नितीन लांडे, रावण ससाणे, पोपट दरंदले, सुधीर चव्हाण, विकास घोक्षे,बापू काळे,युनुस शेख,सलमान शेख, नवनाथ शिरसाठ,शिपाली चव्हाण,मोजणीदार दिपक राहिंज, दप्तर कारकून दिपक कचरे, अभिजित देशमुख, वरिष्ठ लिपिक सुनील तुपे,फिरोज पठाण, अनुरेखक वैभव पावडे,कर्मचारी समीर पठाण, सुभाष गायकवाड,महेश ठुबे,पोपट सरोदे, अनिल कर्डीले, गवाजी शिरसाठ, शांताबाई म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
चिलेखनवाडी उपविभागाचे उपविभागीय अभियंता स्वप्नील देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संतोष राऊत यांनी सूत्रसंचालन केले.नितीन लांडे यांनी आभार मानले.