27.3 C
New York
Wednesday, July 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्‍या माध्‍यमातून दिलेले मुलभूत आधिकार हीच लोकशा‍हीची ताकद – ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-आणीबाणी विरोधातील संघर्षात विचारांच्‍या आधाराव लोकतंत्र सेनानी लढल्‍यामुळेच या देशातील संविधान आणि लोकशाही जिवंत राहू शकली. संविधान हा देशाचा आत्‍मा असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्‍या माध्‍यमातून दिलेले मुलभूत आधिकार हीच लोकशा‍हीची ताकद असल्‍याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

आणीबाणी विरोधातील संघर्षाला ५० वर्ष पुर्ण झाल्‍याचे औचित्‍य साधून स्‍व.खासदार सुर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्‍ठानच्‍यावतीने आणीबाणी विरोधात लढा देताना कारावास भोगलेल्‍या जेष्‍ठ कार्यकर्त्‍यांचा तसेच त्‍यांच्‍या वारसदारांचा सन्‍मान मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत होते. वाल्मिकराव भोकरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन दिनकर, प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजयराव वहाडणे, उपाध्‍यक्ष विनायक गायकवाड, गोदावरी दुध संघाचे अध्‍यक्ष राजेश परजणे, जेष्‍ठ कार्यकर्ते रवीकाका बोरावके यांच्‍यासह भाजप आणि संघ परिवारातील विविध संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, निरपेक्ष आणि निस्‍वार्थी भावनेने आणीबाणीच्‍या विरोधात आपण किंवा आपल्‍या परिवारातील सदस्‍यांनी केलेला संघर्ष हा लोकशाही आणि संविधान वाचविण्‍यासाठीचा होता. तत्‍वाशी कोणतीही तडजोड न करता, अतिशय धैर्याने आपण यासर्व लढाईच्‍या विरोधात कार्यकर्ते एकसंघ उभे राहीले त्‍याची कृतज्ञता या कार्यक्रमातून व्‍यक्‍त करण्‍याची संधी मिळाली हे माझे भाग्‍य आहे.

आज विचारांच्‍या आधारावर देश विश्‍वगुरु होण्‍याच्‍या दि‍शेने वाटचाल करीत आहे. पण या यशाचा पाया आपल्‍या सारख्‍या लोकतंत्र सेनानींनी मजबुत केल्‍यामुळेच देशाच्‍या लोकशाहीचे मंदिर अतिशय समर्थपणे उभे असल्‍याचे सांगून मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, केवळ जाणीवपूर्वक घटना बदलली जाणार असे नकारात्‍मक संदेश देशामध्‍ये पसरविले जातात. मात्र यातून विरोधकांना काहीही साध्‍य होणार नाही. कारण त्‍यांचे नेते विदेशात जावून भारताच्‍या संविधानावर टिका करतात.

प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजयराव वहाडणे यांनी संपूर्ण संघर्ष हा जवळून पाहीला आहे. कुटूंबाची वाताहत झाली, परंतू विचारांपासून कार्यकर्ते थोडेही दुर झाले नाहीत असे गौरोद्गार काडून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या लढ्याला ५० वर्ष पुर्ण होत आहेत. या लढ्याचे मुल्‍य होवू शकत नाही. परंतू राज्‍यातील महायुती सरकारने लोकतंत्र सेनानींसाठी कृतज्ञता निधीची योजना तयार केली आहे. या लढ्याला ५० वर्ष होत असल्‍याचे औचित्‍य साधून लढ्यातील योध्यांचे स्‍मरण ठेवणारे महाराष्‍ट्र राज्‍य हे एकमेव ठरले असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!