कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार बु चे माजी उपसरपंच, धार्मिक कामात सतत अग्रेसर असणारे , पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक स्वप्निल निबे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हार येथील त्यांचे मित्र परिवार आशुतोष बोरसे, सुजित खळदकर, विकी डंक, प्रताप खोसे व मित्र परिवारातर्फे गोमातेची निस्वार्थपणे सेवा करणारे राहुरी येथील गोसेवक बंटी पटारे यांच्याकडे श्रीरामपूर येथील कामधेनू गोशाळेतील गोमातेसाठी एक गाडी हिरवा चारा दान करण्यात आला.
सर्व सत्कार हार तुरे यांना फाटा देत या अनोख्या पद्धतीने मित्राचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.