21.8 C
New York
Wednesday, July 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

कला केंद्रात आमदाराच्या भावाचा गोळीबार

पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):-पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण? हे शोधण्याची गरज आहे. पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणालेत.

सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांचे नेते गत काही दिवसांपासून सातत्याने वादात सापडत आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात पत्ते खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सरकारची सर्वत्र छी थू होत असताना आता रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने चक्क कलाकेंद्रात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत? हे शोधण्याऐवजी पोलिस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.

दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये केली आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात कलाकेंद्रात धुडगूस घालणारा आरोपी कोणत्या आमदाराचा भाऊ आहे? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!