अहील्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-सहकारी बॅकींग क्षेत्रात प्रवरा सहकारी बॅकेने प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे.विळदघाट येथे नव्याने सुरू झालेली बॅकैची शाखा अहील्यानगरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत महत्वपूर्ण भागीदारी करेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
प्रवरा सहकारी बँकेने विळदघाट येथे सुरू केलेल्या बॅकेचे कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमास माजी आमदार नंदकुमार झावरे, वसंतराव कापरे बॅकेचे चेअरमन डॉ भास्कराव खर्डे, व्हा.चेअरमन मच्छीद्र थेटे ,सीईओ सौरभ बालोटे सर्व संचालकांसह पद्मश्रीं डॉ विखे पाटील फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ अभिजीत दिवटे डॉ पांडूरंग पवार यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अतिशय दूरदृष्टीने या बॅकेची मुहूर्तमेढ रोवली.समाजातील छोट्या वर्गाला या बॅकेने विविध कर्ज योजनेतून आधार दिला.आज सभासद ठेवीदार आणि चांगल्या कर्जदारांच्या सहकार्याने पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल बॅकेने पूर्ण केली असून सुमारे चौदाशे कोटी रुपयांचा व्यावसायिक टप्पा पूर्ण केला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
विळदघाट येथे बॅकेची सुरू होणारी बॅकेची शाखा अहील्यानगर जिल्ह्यातील व्यापारी उद्योजक आणि छोट्या व्यवसायिकांच्या करीता आधार ठरेल.अहील्यानगरच्या व्यापरी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी पंरपंरा लाभली असल्याने भविष्यात या शहराच्या या प्रगतीत प्रवरा बॅके नक्कीच चांगली भागीदारी करेल.नागापूर औद्योगिक वसाहतीला ही शाखा खूप जवळ असल्याने उद्योजकांना दैनंदीन अर्थिक व्यवहारासाठी विश्वासाचे ठिकाण निर्माण झाले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
बॅकींग क्षेत्रात वाढती स्पर्धा पाहाता ग्राहकांच्या सुध्दा काही अपेक्षा जाणून घेण्यासाठी प्रवरा बँकेच्या वतीने ग्राहक तसेच उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.सर्वाचे स्वागत बॅकेचे चेअरमन डॉ भास्कराव खर्डे यांनी केले.