शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):-मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिर्डी विधानसभा मतदार संघातील चार मंडलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीरात रक्तदान करुन, २०० हून अधिक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महारक्तदान शिबीर संपन्न झाले.
राहाता येथे शहर मंडलामध्ये आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीराचे औपचारिक उद्घाटन रणरागीनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडल अध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नितीन कापसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिर्डी येथे महारक्तदान शिबीरास शहर आणि परिसरातील युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. शहर अध्यक्ष रविंद्र गोंदकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या शिबीराचे नियोजन केले होते. कोल्हार मंडलातील महारक्तदान शिबीर लोणी बुद्रूक येथील जनसेवा जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाले. जोर्वे मंडलाचे महारक्तदान शिबीर गावातील पद्मभूषण डॉ.विखे पाटील सभागृहामध्ये आयोजित करण्यातआले होते.