कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील महालक्ष्मी फिरस्ती माता यात्रा उत्सव मंगळवार दि. 22 रोजी मोठया उत्सहात संपन्न झाला .
यावेळी पुणतांबा येथून गंगेचे पाणी आणून गावात वाजत गाजत कावडीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी कावडीचे भव्य स्वागत करण्यात आले, यानंतर गंगेच्या पाण्याने देवीला महा अभिषेक करण्यात आला व नंतर सत्यनारायण महापूजा करण्यात आली. सायंकाळी 5 वा. देवीच्या पालखीची मंदिरापासून गावात सवाद्य प्रदक्षिणा करण्यात आली. सायंकाळी बरोबर 7.15 वा.गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
याप्रसंगी आरतीचा प्रथम मान कोल्हार बुद्रुक चे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे,पद्मश्री विखे कारखान्याचे माजी संचालक स्वप्निल निंबे, सुभाष शिंगवी,शंकर बर्डे,दिनेश बर्डे,फिरस्ती माता यात्रा उत्सव समिती अध्यक्ष हर्षद बर्डे यांना देण्यात आला.
तसेच दिलीप बोरुडे,दिनेश बर्डे, उपाध्यक्ष आदित्य माळी, खजिनदार वैभव माळी,यात्रा उत्सव मार्गदर्शक किरण भाऊ माळी सुनील बोरुडे पिंटू माळी,गुलाब बर्डे भाऊसाहेब बर्डे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बर्डे व फिरस्ती माता मित्र मंडळ विशाल बर्डे,सौरभ बर्डे, तुषार बर्डे,सोनू बर्डे,विष्णू बर्डे, अजय इंगळे ,भारत जाधव,मुकुंद गांगुर्डे राहुल माळी,हरीश निकम, अमोल बर्डे, तसेच कोल्हार ग्रामस्थ आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस विभागाने यावेळी चोक बंदोबस्त ठेवला होता.