अकोले (जनता आवाज वृत्तसेवा):-अकोले तालुक्यातील सन 2025 ते 2030 सालच्या 47 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या ग्रामपंचायत मध्ये अकोले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या गावांचा समावेश त्यामुळे या गावातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या आरक्षण सोडतीमुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंच यांचे आनंदावर विरजण आले आहे.अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता सरपंच पदासाठी चार गावे, अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच पदासाठी 12 , नागरिकांच्या मागास प्रवर्ग सरपंच पदासाठी 13 तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या 18 गावांच्या सरपंच पदाची सोडत आज काढण्यात आली.
अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता सरपंच पदासाठी आरक्षण सोडत निघालेली गावे-
रुंभोडी, नवलेवाडी, औरंगपूर व पिंपळगाव निपाणी
अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच पदाची गावे -खानापूर, देवठाण, पिंपळगाव खांड, धामणगाव आवारी,लहीत बुद्रुक, जाचकवाडी, तांबोळ, विरगाव, वाघापूर, सुगाव खुर्द, गणोरे व मनोहरपुर
नागरिकांच्या मागास प्रवर्ग सरपंच पदासाठीचे गावे -कळस बुद्रुक, जांभळे, कुंभेफळ, उंचखडक खुर्द, अंबड, टाकळी, रेडे ,लहीत खुर्द, पिंपळदरी, चास, चैतन्यपूर, हिवरगाव व कळंब
सर्वसाधारण प्रवर्गाच्या गावांच्या सरपंचपदाची गावे -गर्दनी ,ढोकी इंदूरी, मेंहैंदूरी, बहिरवाडी, डोंगरगाव, सुगाव बुद्रुक, कळस खुर्द, धुमाळवाडी, वाशेरे, परखतपूर, उंचखडक बुद्रुक, मोग्रस, लिंगदेव, बोरी, मन्याळे, बेलापूर व बदगी
या 47 ग्रामपंचायतींच्या जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता उद्या गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी विशाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली महिला व पुरुष यांचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती निवासी नायब तहसीलदार लोहारे यांनी दिली.