श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :-श्रीरामपूर तालुक्यातील 52 पैकी तब्बल 27 गावांमध्ये ‘महिला राज’ येणार आहे. दरम्यान, केवळ २५ ग्रामपंचायती पुरुषांचा ताब्यात राहणार आहेत. पढेगाव, वडाळा महादेव, निमगाव खैरी, उक्कलगाव, कारेगाव, मातापूर, मुठेवडगाव, नाऊर, बेलापूर बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती असणार आहे.
येथील प्रशासकीय सभागृहात तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी महिला सरपंचपदाचे आरक्षण नियमांच्याआधारे 52 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे महिला आरक्षणाची सोडत काढली. तालुक्यातील 52 गावांमधील सरपंचपदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती 13 पैकी 7 महिला 6 पुरुष, अनुसूचित जमाती 8 पैकी 4 ग्रामपंचायतींमध्ये महिला, तर 4 ग्रामपंचायतींमध्ये पुरुष असणार आहेत. इतर मागास प्रवर्ग 14 पैकी 7 महिला, तर 7 ग्रामपंचायती पुरुषांकडे राहणार आहेत.
सर्वसाधारणमध्ये 17 पैकी 9 ग्रामपंचायतींमध्ये महिला, तर 8 ग्रामपंचायतीचा कारभार पुरुष पाहणार आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गात
मांडवे, कुरणपूर, पढेगाव, वडाळा महादेव, निमगाव खैरी, मालुंजा बुद्रूक, लाडगाव, या ग्रामपंचायतीत महिलांसाठी आरक्षण निघाले, तर उर्वरित गोवर्धनपूर, मातुलठाण, दत्तनगर, पढेगाव, निपाणी वडगाव, वडाळा महादेव, खानापूर, उंबरगाव या गावांमध्ये पुरुषांसाठी आरक्षण पडले आहे.
अनुसूचित जमातीमध्ये
ब्राम्हणगाव वेताळ, रामपूर, माळेवाडी व वळदगाव या ग्रामपंचायतींमध्ये महिलांच्या हाती कारभार असणार आहे. खोकर, टाकळीभान, भैरवनाथनगर, माळेवाडी, वळदगाव, महांकाळ वडगाव येथे पुरुष कारभार पाहणार आहेत.
ना.मा.प्र. –
भामाठाण (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), एकलहरे, जाफ्राबाद, उक्कलगाव, उंदिरगाव, वांगी बुद्रूक व कारेगाव या 7 गावांमध्ये महिला, तर गुजरवाडी, हरेगाव (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), खंडाळा, खिर्डी, शिरसगाव, वांगी खुर्द, कान्हेगाव या 7 गावांमध्ये पुरुषांसाठी आरक्षण निघाले आहे.
सर्वसाधारण–
गळनिंब, घुमनदेव, गोंडेगाव, मातापूर, मुठेवाडगाव, नाऊर, नायगाव, सराला व बेलापूर बुद्रूक या गावांचा कारभार महिलांच्या हाती, तर बेलापूर खुर्द, भेर्डापूर, भोकर, दिघी, फत्याबाद, कडीत बुद्रूक, कमालपूर व माळवडगाव या ग्रामपंचायतींची सत्तासूत्रे पुरुष सांभाळणार आहेत.