श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): – उद्या शुक्रवारी श्रीरामपूरचा आठवडे बाजार असून या बाजारामध्ये नगरपालिकेने निश्चित केलेले ठिकाणीच विक्रेते व शेतकरी यांनी आपली दुकाने लावावीत बाजार टाळा शिवाय इतर ठिकाणी कोणी बसू नये. विशेषत: नवीन मराठी शाळा रोड व संजीवन हॉस्पिटल रोडवर कुणीही आपली दुकाने लावू नये अन्यथा नगरपालिकेला कारवाई करणे भाग पडेल. त्याऐवजी महाडा कॉलनीतील रस्त्यावर नगरपालिकेने आठवडे बाजार करून च्या दुकानासाठी जागा निश्चित केली आहे . बाजारासाठी येणारे विक्रेते शेतकरी यांनी याबाबत पालिके सहकार्य करून रहदारी विस्कळीत होणार नाही यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे .
श्रीरामपूरच्या आठवडे बाजार शहराच्या विविध भागात खूपच विस्तारला असून नवीन मराठी शाळा रोड तसेच संजीवन हॉस्पिटल पासून शिवाजी रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने विक्रेते बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
याबाबत शहरवासी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने गेल्या आठवड्यापासून नगरपालिकेने या दोन्ही रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास मनाई केली आहे मोठा रहदारीचा रस्ता असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे हे सर्व टाळण्यासाठी विक्रेत्यांनी या दोन्ही रस्त्यावर बसू नये त्याऐवजी बाजा तळाची मुख्य जागा त्याचप्रमाणे म्हाडा कॉलनीतील रस्त्यावर दुकाने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्या ठिकाणी विक्रेते आपली दुकाने लावू शकतात.