31.3 C
New York
Friday, July 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीगोंदा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आज सोडत

श्रीगोंदा (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीगोंदा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण आज प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसिलदार सचिन डोंगरे, अप्पर तहसिलदार प्रविण मुदगुल, नायब तहसिलदार मिलींद जाधव यांच्या उपस्थितीत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली.

या मध्ये अनुसूचित जाती व्यक्ती ५ ग्रामपंचायत, अनुसूचित जाती महिला सरपंच ५ ग्रामपंचापयत, अनुसूचित जमाती व्यक्ती ग्रामपंचायत, अनुसूचित जमाती महिला ३ ग्रामपंचायत, नागरीकंचा मागास प्रवर्ग व्यक्ती ११ ग्रामपंचायत, नरागरीकांचा मागास प्रवर्ग महिला १० ग्रामपंचायत, सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती २३ ग्रामपंचायत, सर्वसामान्य महिला प्रवर्ग २३ असे एकुण ८२ ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले.

आज झालेल्या आरक्षण सोडतीतील ग्रामपंचायतींची नावे-

अनुसूचित जाती व्यक्ती साठी सरपंचपदासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायत-

निंबबी, सारोळा सोमवंशी, देवदैठण, कोसेगव्हाण, भानगाव

अनुसूचित जाती महिला सरपंच पदासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायत-

एरंडोली, देऊळगाव, तांदळी दुमाला, हिंगणी दुमाला, घोटवी.

अनुसूचित जमाती व्यक्ती सरपंच पदासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायत-

आनंदवाडी, घुगलवडगाव.

अनुसूचित जमाती महिला सरपंच पदासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायत-

दाणेवाडी, बाबुर्डी, वांगदरी.

नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती सरपंच पदासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायत-

वेळू, टाकळी कडेवळीत, लिंपणगाव, चिंभळा, लोणीव्यंकनाथ, शिरजगाव बोडखो, म्हातारपिंपरी, पिंपरी कोलंदर, घोगरगाव, खांडगाव, ढोरजे.

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंच पदासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायत-

चांडगाव, कौठा-शिपलकरवाडी, गव्हाणेवाडी, रायगव्हाण कोरेगाव, कोथुळ, पिसोर खांड, कोंडेगव्हाण, ढवळगाव, म्हसे.

सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती सरपंच पदासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायत

आर्वी-अनगरे, उक्कडगाव, उख्खलगाव, कोरेगव्हाण, घोडेगाव, चाभुर्डी, टाकळी लोणार, अजनुज, तडगव्हाण, पारगाव सुद्रिक, बांगर्डे, बेलवंडी कोठार, मुंगुसगाव, राजापूर, रुईखेल, गार, विसापुर, शेडगाव, सुरोडी, हिरडगाव, येवती, सुरेगाव, चवर सांगवी.

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायत

चोराचीवाडी, वडाळी, आढळगाव, पेडगाव, आधोरेवाडी, काष्टी, चिखलठाणवाडी, निमगाव खलू, सांगवी दुमाला, हंगेवाडी, बोरी, येळपणे, मढेवडगाव, अरणगाव दुमाला, बेलवंडी बु., माठ, कोळगाव, पिंपळगाव पिसा, घुटेवाडी, चिखली, बनपिंप्री, थिटे सांगवी, कामठी.

आरक्षण बदल झाल्याने काहींना धुमारे फुटले असून काहींची गोची झाली आहे. गावावरील सत्ता कायम ठेवण्यासाठी आजपासून हालच- गाली गतिमान होणार आहे. गावावरील सत्ता कायम ठेवण्यासाठी आजपासून हालचाली गतिमान होणार आहे. यासह कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यास सुरुवात झाली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!