नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा) :-नेवासा तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत गुरूवारी (दि.२४) तहसील कार्यालयात काढण्यात आली. तालुक्यातील मोठी गावे आरक्षित झाल्याने सरपंचा साठी इच्छुकांचा हिरमोड झालेला आहे. काही मध्यम गावे खुली झाल्याने अनेकांची काॅलर टाईट झाल्याचे दिसत आहे. तालुक्यात महिलाराजचे वर्चस्व दिसणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांतधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार डॉ संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता ८८ सरपंच पदांचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी उपस्थित होते. अशिष कांबळे या सात वर्षाच्या मुलाच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्या काढण्यात आल्या.
यामध्ये अनुसूचित जाती- व्यक्ती ७ व महिला ६,
अनुसुचित जमाती- व्यक्ती ३ व महिला ४,
नागरिकाचा मागास प्रवर्ग – व्यक्ती १३व महिला ११,
सर्वसाधारण – व्यक्ती २४ व महिला २०.
व्यक्ती साठी ४७ व महिला ४१ असे एकूण ८८ सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढण्यात आली.
तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
सर्वसाधारण महिला राखीव असलेली गावे अशी –
सुलतानपूर, तरवडी, टोका, पाचूंदे, सोनई, शिरेगाव, उस्थळ दुमाला, शिंगवे तुकाई, माका, पाचेगाव, बेलपिंपळगाव, वरखेड, वाकडी, चांदा, खरवंडी, नजिक चिंचोली, बहिरवाडी, माळीचिंचोरा, कौठा, वडाळा बहिरोबा.
सर्वसाधारण साठी –
रांजणगाव, सलाबतपूर, जैऊरहैबती, सौंदाळा, पुनतगाव, तामसवाडी, बाभुळखेडा, बकुपिंपळगाव, देवगाव, देवसडे, गळनिंब, गेवराई, हंडीनिमगाव, हिंगोणी, मक्तापूर, लोहगाव, म्हाळसपिंपळगाव, मोरयाचिंचोरे, पिचडगांव, प्रवरासंगम, सुरेशनगर, तेलकुडगाव, वांजोळी, प्रिंपीशहाली.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी –
रस्तापूर, गोधेगाव, भालगाव, फत्तेपूर, कांगोणी, मुरमे, निपाणी निमगाव, नविन चांदगाव, चिंचबन, नागापूर, जळके बुद्रुक, भेंडा खुर्द.
अनुसूचित जाती साठी –
ब-हाणपूर, सुरेगाव गंगा, रामडोह, खुणेगाव, मांडेगव्हाण, उस्थळ खालसा.
अनुसुचित जमाती साठी –
वाटापूर, निंभारी, जळके बुद्रुक, कारेगाव, जैनपूर, गोंडेगाव, पानेगाव.
तामसवाडी, सलाबतपूर, देवगाव, सौंदाळा, प्रवरासंगम, तेलकुडगाव ही मोठाली गावे सरपंच पदांसाठी खुली झाल्याने याठिकाणी सरपंच होण्याकरिता भाऊगर्दी दिसणार आहे.
तर राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या सोनई, शिरेगाव, माका, पाचेगाव, बेलपिंपळगाव, चांदा, खरवंडी, माळीचिंचोरा, वडाळा बहिरोबा आदि गावात महिलाराज दिसणार आहे. तालुक्यात एकंदरीत अनेकांचा आरक्षणामुळे हिरमोड होवून गांवपुढाऱ्यांच्या स्वप्नांना ब्रेक लागल्याने तालुक्यात महिलाराजचे वर्चस्व दिसणार आहे.