राहाता (जनता आवाज वृत्तसेवा)- राहाता तालुक्यातील ५० ग्रामपंचायर्तीचे २०२५-३० करीता सरपंच पदाचे पुन्हा आरक्षण जाहीर झाले आहे. याआधी काढलेल्या आरक्षणानुसार फक्त ओबीसी प्रवर्गासाठी असलेल्या रामपूरवाडी गावचे सरपंच पदाचे आरक्षण आता खुल्या प्रवर्गासाठी गेले तर धनगरवाडी गावचे खुले आरक्षण आता ओबीसी प्रवर्गासाठी लागू झाले आहे. या दोन गावांच्या आरक्षणात बदल झाला आहे. महिलांसाठी २६ ग्रामपंचायतींवर आरक्षण जाहीर झाले.
राहाता तहसील कार्यालयात आरक्षण सोडत प्रक्रिया शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले. 50 पैकी १५ ग्रामपंचायती मध्ये
अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षण जाहीर झाले. यात
नांदुर्खी बुद्रुक, सावळीविहीर खुर्द, हणमंतगाव, रुई, दुर्गापूर, अस्तगाव, लोणी खुर्द, पिंपळवाडी तर पुरुषांसाठी पिंपळस, दहेगाव कोऱ्हाळे, नांदूर, बाभळेश्वर, खडकेवाके, कोऱ्हाळे,वाळकी या गावांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती सरपंचासाठी ९ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण आहे. यामध्ये महिलांसाठी
निमगाव कोऱ्हाळे, सावळीविहीर बुद्रुक, चितळी, भगवतीपूर, जळगाव तर पुरुषांसाठी राजुरी वाकडी, ममदापूर, साकुरी याग्रामपंचायतींचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी १४ ग्रामपंचायती आरक्षित यामध्ये महिलांसाठी
आडगाव खुर्द, चंद्रापूर, दाढ बुद्रुक, लोहगाव, पिंप्री लोकाई, कोल्हार बुद्रुक, धनगरवाडी तर पुरुषांसाठी
कनकुरी, न.पा. वाडी, नांदुर्खी खुर्द, निघोज, निर्मळ पिंपरी, रांजणखोल, डो-हाळे या गावांचा समावेश आहे.
सर्वसाधारण करिता १२ ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी
एकरुखे, गोगलगाव, हसनापूर, पाथरे बुद्रुक, तिसगाव, रामपूरवाडी आडगाव बुद्रुक, केलवड बुद्रुक, लोणी बुद्रुक, पुणतांबा, रांजणगाव खुर्द, शिंगवे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
होणारी सरपंच पदाची निवडणूक ही सदस्यातून सरपंच नसून आता लोकनियुक्त सरपंच असणार आहे, त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे. तर या आरक्षणामुळे काहींची पंचायत झाली आहे.