लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):- शालेय जीवनापासूनच आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे ओळखूनच लोकनेते खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून लोणी येथे प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी सुरू होत आहे.
विद्यार्थी दशेपासूनच खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना पटावे व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या भूमिकेतून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या समोरील सिंधुताई विखे पाटील क्रीडांगणामध्ये हॉलीबॉल, खो – खो, तायक्वांदो व अथलेटिक्स या खेळांचे प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहेत. यामध्ये तज्ञ क्रीडा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 911 222 38 15 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. व जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.सुष्मिता विखे पाटील यांनी केले.