25.3 C
New York
Saturday, July 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हार येथे भव्य प्रदर्शन प्रारंभ

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-ऑनलाइन विक्रीच्या फसवेगिरी व्यवहाराला फाटा देत कोल्हार येथील बेलापूर रोड लगत असलेल्या वर्धमान जैन स्थानकामध्ये विविध गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शनिवार दिनांक 26 एप्रिल ते रविवार दिनांक 27 एप्रिल असे दोन दिवस हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी सुरू असणार आहे.

यामध्ये राखी, ज्वेलरी, लेडीज वेअर,किड्स वेअर,शर्ट्स, स्किन केअर याचबरोबर विविध घरगुती उपयोगी वस्तूंचे वेगवेगळे असे 21 स्टॉल मांडण्यात आले आहे. पुणे, नगर, राहता, लोणी, संगमनेर, तसेच स्थानिक कोल्हारच्या विक्रेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

मागील वर्षी या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्या कारणाने याही वर्ष खास ग्राहकांच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन भरवले असल्याची माहिती प्रसिद्ध अँकर सोनाली चोरडिया यांनी यावेळी दिली . त्याचबरोबर प्रदर्शन स्टॉलच्या बाहेर देखील विविध प्रकारचे स्वादिष्ट फूड स्टॉल उभारण्यात आले आहे याला देखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान शनिवारी सकाळी 11:30 वा. व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी , उद्योजक महेंद्र कुंकूलोळ यांच्या शुभहस्ते फित कापून प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी उद्योजक नंदकुमार भटेवरा, सुधीर चोरडिया अशोक भाटिया, योगेश गांधी, मुकेश चोरडिया डॉ.राजेंद्र गुगळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. दरम्यान प्रथम सोनाली चोरडिया यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. याप्रसंगी संजय शिंगवी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की मोठमोठ्या शहरांमध्ये ग्राहकांसाठीअशा प्रकारचे प्रदर्शन सर्रास भरवले जातात परंतु कोल्हारमध्ये अशा प्रकारचे प्रदर्शन भरून ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्ध करून दिल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे.

यामुळे स्थानिक बाजारपेठेला देखील चालना मिळते तसेच ग्राहक वर्ग देखील उत्तम वस्तू खरीदण्यासाठी उत्सुक असतात परंतु ऑनलाईन खरेदीच्या नादात ग्राहकांची फसवणूक होऊन अतोनात नुकसान होत असल्याच्या वेळोवेळी निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन या पुढील काळात देखील वेळोवेळी भरवण्यात यावे असा विनंती वजा सल्ला यावेळी त्यांनी दिला. या प्रसंगी योगेश गांधी व नंदकुमार भटेवरा यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!