आहील्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यासमवेत जिल्ह्यातून आलेल्या नागरीकांच्या समस्या जनता दरबारातून जाणून घेतल्या.प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेवून आलेल्या प्रत्येक अर्ज निर्धारीत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अहील्यानगर येथील पालकमंत्री कार्यालयात ना.विखे पाटील यांनी दुपारी बारा वाजल्यापासून नागरीकांच्या भेटीसाठी उलबध्द होते.अतिरीक्त जिल्हाधिकरी शैलेंद्र हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे,अतिरीक्त पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्गी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे तसेच जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांसह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महीन्यातून एकदा संपर्क कार्यालयात जनता दरबार घेण्याची प्रथा सुरू केली आहे.अधिकार्याना उपस्थित ठेवून नागरीकांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची मंत्री विखे पाटील यांची हतोटी असल्याने प्रत्येक जनता दरबारास नागरीकांची उपस्थिती लक्षवेधी असते.
रविवारी बारा वाजल्यापासून पालकमंत्री कार्यालयात नागरीकांच्या भेटीसाठी उपस्थित होते.शहरासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील नागरीक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या परीसरातील प्रश्नाची निवेदन देवून मंत्र्यासमोर तक्रारी मांडत होते.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्येक अर्जावर कार्यवाही करण्याच्या सूचना तसेच काही अर्जावर निर्धारीत वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले.याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग महानगराचे अध्यक्ष अनिल मोहीते, विनायक देशमुख, निखिल वारे यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.