लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत अशावेळी आजी आजोबा त्यांची उणीव भरून काढतात. मुलांच्या जडणघडणीत आजी आजोबा फार महत्त्वाची भूमिका बजावतात. नातवांवर योग्य संस्कार करून त्यांना भावनिक आधार देतात.प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून शिक्षणांसोबतचं संस्कारक्षम पिढी घडविण्याचे का म होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे आजी आजोबा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ.विखे पाटील बोलत होत्या. यावेळी सरस्वती धावणे,प्राचार्य विजय आहेर यांच्या विविध भागातील आजी-आजोबा,पालक शिक्षक उपस्थित होते.
विजय आहेर यांनी आजी आजोबांचे महत्व विशद केले.यावेळी आजी-आजोबांचे महत्त्व सांगणारे अतिशय सुंदर नृत्य एलकेजी व युकेजीच्या चिमूरड्यांनी सादर केले तदनंतर नाटिका सादर करण्यात आली. आजी आजोबांसाठी विविध मनोरंजक खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सर्वच आजी आजोबांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. खेळांमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या आजी आजोबांना सौ.विखे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.