नागपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-बुद्धीबळ पटावर महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने पुन्हा एकदा आपल्या खेळाने देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. दिव्याने पिढी चॅम्पियनशिपमध्ये शानदार विजय मिळवत ‘ग्रँड मास्टर’ पदवी मिळवली असून, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे
चेस असोसिएशनतर्फे लवकरच दिव्याचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती एस एस सोमन यांनी दिली आहे.
ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होती. दोघेही खेळाडू क्लासिकल फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट खेळले, मात्र सामना टाय-ब्रेकमध्ये गेला. निर्णायक क्षणी दिव्याने ग्रुप एंडिंगमध्ये कमालीचं संयमित आणि रणनीतीयुक्त खेळ करत विजय आपल्या नावावर केला.
वयाने लहान असली तरी दिव्याच्या खेळात प्रचंड परिपक्वता आणि अंतिम क्षणांमध्ये निर्णय घेण्याचं कौशल्य दिसून आलं. तिचा हा विजय केवळ तिला ‘ग्रँड मास्टर’ बनवत नाही, तर तिचं नाव भारतीय बुद्धिबळाच्या नव्या युथ प्रतीकांमध्ये उजळपणे अधोरेखित करतो.