कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार भगवतीपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेमध्ये श्रावण महिन्यातील पहिला सोमवार निमित्त येथील फिरस्ती माता यात्रा उत्सव समितीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना फराळ(लाडू, केळी, शिरा) वाटप करण्यात आले.
दरम्यान अश्या प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार होतात व हिंदू मुस्लिम मुलांमध्ये आपापसात आदर प्रेम व एकीची भावना निर्माण होत असल्याचे मत पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे यांनी या वेळी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद व समाधान दिसत होते. शाळेचे मुख्याध्यापक अनाप यांनी शाळेच्यावतीने सर्व उत्सव समिती सदस्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात हर्षद बर्डे यांचा सत्कार करून या उपक्रमा बद्दल आभार मानले.
याप्रसंगी पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे,कोल्हार बु चे उपसरपंच गोरख खर्डे , शाम गोसावी, संतोष लोखंडे,रवींद्र शिंदे, हर्षद बर्डे, सुनील बोरुडे, श्याम लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.