कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- दि. 28 जुलै रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथील कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविक भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी मोठ्या भक्ती भावाने शंभू महादेवाचे दर्शन घेतले.भाविक भक्तांना येथील महाशिवरात्र महोत्सव समितीतर्फे 301 लिटर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.संध्याकाळी साडेसहाच्या नित्य आरतीनंतर शंभू महादेवाला मसाला दुधाचा नैवेद्य दाखवून वाटप सुरू झाले.
येणाऱ्या लहान थोर स्त्री पुरुष अश्या जवळजवळ तीन ते साडेतीन हजारच्या वर भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला. मोठ्या आदराने व आग्रहाने मसाला दुध वाटप करण्याच्या या सेवेचे कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे यांनी उपस्थिती लावून विशेष कौतुक केले व या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. विशेष बाब म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील श्रावणातील एका सोमवारी निश्चितच उपस्थित राहणार असल्याचे सांगून या उपक्रमात फोनवरून शुभेच्छा दिल्या.
महाशिवरात्र महोत्सव समितीतर्फे गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात,त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी श्रावण मासामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी गरमागरम मसाले दुधाचे वाटप केले जाते.गावातील,परिसरातील तसेच दूरदूर वरून येणारे भावी भक्त यासेवेचा आवर्जून लाभ घेऊन तृप्त होतात. या सेवेमुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊन सर्वांना आत्मिक समाधान लाभत असल्याचे मत महाशिवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय मोरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे, कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच गोरख खर्डे, आबा खर्डे, राजेंद्र राऊत, विनीत हिरानंदानी,योगेश बोरुडे, मयूर कडसकर, संदीप राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाशिवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय मोरे,अमोल सावंत, आशुतोष बोरसे,शेखर सुरशे,गौरव गालंडे,रोहित देडगांवकर,राहुल मोरे,दिनेश राकेचा,अनिकेत राजभोज,शिवराज विखे, दिगंबर दळवी,वीरेंद्र गोसावी,ओम सातपुते,ओम राजभोज,हरिष निकम,योगेश बनसोडे,सलमान सय्यद,मयुर कडस्कर,दीपक चव्हान,गणेश दळवी,प्रथमेश काळे,सचिन राऊत,स्वप्नील कडसकर,ओंमकार राजभोज, सौरभ मोरे,सिधार्थ लोखंडे, कौशल दळवी,तन्मय राजभोज,आदित्य मोरे, पप्पू गरगडे,आशिष कुंभकर्ण,मनोहर गुलाटी,प्रज्वल तांबे,प्रणव गुगळे,कौस्तुभ अंभोरे,साईराज तांबे आदी सदस्य प्रयत्नशील आहेत.