माळवाडगाव(जनता आवाज वृत्तसेवा) :– गोदावरी तीरावर वैजापूर-श्रीरामपूर तालुका हद्दीवर शनिदेवगाव सप्तक्रोशीत उद्या बुधवार दि. ३० जुलैपासून सुरू होणाऱ्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७८ व्या सप्ताहाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे मिरवणुकीने सप्ताहस्थळी आगमन होणार आहे.
सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे हजारो तरुणांच्या समवेत मोटारसायकल रॅलीने आगमन होणार आहे, त्यांचे हनुमान मंदीर, अवलगाव व हमरापूर येथे दर्शन घेऊन बाजाठाण येथे आगमन होईल. महंत रामगिरी महाराज यांनी १४ वर्षे वास्तव्य केलेल्या शिवगिरी आश्रम, बाजाठाण येथे आशुतोष महादेव मंदिरात दर्शन घेऊन मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. शनिदेवगाव येथील रामेश्वर मंदिर व शनैश्वर मंदीरात दर्शनानंतर मिरवणूक सप्ताहस्थळी येणार आहे.
मिरवणुकीत शनैश्वर मंदीर रथ, शनिदेवगाव, संत ज्ञानेश्वर माऊली ७५० वा जन्मोत्सव सोहळा व जगदगुरु संत तुकाराम महाराज ३७५ व्या सहदेह वैकुंठ गमन सोहळा रथ, घोगरगाव व चेंडुफळ, श्रीराम रथ व भगवान शिव आशुतोष महादेव रथ, बाजाठाण, श्रीक्षेत्र गोदाधाम सरालाबेट, रथ अवलगाव, हमरापुर, सिद्धेश्वर महादेव मंदीर रथ, भामाठाण, लीलाचरित्र चक्रधर स्वामी रथ, कमालपूर आदी रथ या मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे.