मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलाय.
माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असणार आहेत.
अर्थात एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचं खातं बदलतं त्यांची खुर्ची वाचवलीय. मात्र झालेला खातेबदल हाही कोकाटेंना एक मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.