कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-साई सच्चरित्र हा पवित्र प्रासादिक ग्रंथ आहे, याची मनोभावे वाचनरूपी सेवा केल्याने मनातील सर्व सात्विक इच्छा पूर्ण होण्याचे फळ निश्चितच मिळते. आपल्यावर असलेली भगवंताची कृपा स्थिर राहण्यासाठी त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे आणि भगवंत हा तोंडी लावण्या पुरता न ठेवता सातत्याने भजला तरच परमार्थ असतो असे सुंदर विवेचन काल्याच्या किर्तन प्रसंगी साई कथाकार ह भ प विकास महाराज गायकवाड यांनी केले . षडरुपु आणि इंद्रियरुपी गाईंना सतत वळवावे लागते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने भगवंताचे अधिष्ठान लाभते,भगवंत नामाची संगत हीच आपल्या जीवनाची खरी फलप्राप्ती आहे. साई भगवान तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो असे आशीर्वाद देऊन त्यांनी काल्याच्या कीर्तनाला विराम दिला.
दरम्यान याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी देखील उपस्थिती लावून आशीर्वादरुपी शुभेच्छा .
श्री साई भगवती ग्रुप व ग्रामस्थ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी येथील श्री भगवती माता मंदिरामध्ये श्री साई सच्चरित पारायणास ग्रंथदिंडी काढून मोठ्या मंगलमय वातावरणात सुरुवात झाली होती. पारायणाचा आजचा सांगतेचा दिवस होता.पहाटे काकड आरती झाल्यानंतर ह भ प गणेश महाराज मुसमाडे यांच्या सुमधुर वाणीने अवतरणीका वाचन होऊन पारायण समाप्ती झाली.दरम्यान सकाळी 9 वा. भगवती माता मंदिरापासून भव्य ग्रंथ पालखी मिरवणूक काढण्यात आली, यामध्ये असंख्य पारयणार्थी तसेच ग्रामस्थांनी सामील होऊन पालखीची शोभा वाढवली.
दरम्यान सकाळी 10:30 वा. साई कथाकार ह भ प विकास महाराज गायकवाड यांच्या काल्याच्या कीर्तनास सुरुवात झाली यावेळी त्यांनी मानवी जीवनातील दाखले देत विनोदरुपी शैलीमध्ये अतिशय सुंदर विवेचन केले. याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन भास्करराव खर्डे, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे, प्रवरा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक असावा, कोल्हार भगवतीपुरचे उपसरपंच प्रकाश खर्डे, कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच गोरख खर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी काँग्रेसच्या राज्य जनरल सेक्रेटरीपदी नुकतीच निवड झालेल्या जिल्ह्यातील महिला नेत्या प्रभावतीताई घोगरे यांनी सदिच्छा देखील भेट दिली. त्यांचा यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.दरम्यान डॉ.भास्कर खर्डे व ॲड सुरेंद्र खर्डे यांनी विकास महाराज गायकवाड व व्यासपीठ चालक गणेश महाराज मुसमाडे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला व आपले मनोगत व्यक्त केले .
दरम्यान खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे गावोगावी आयोजन केले पाहिजे तसेच सबका मालिक एक हा साईबाबांचा संदेश याद्वारे समाजामध्ये पोहोचला जावा असे उद्गार ॲड सुरेंद्र खर्डे यांनी यावेळी काढले.
कोल्हार भगवतीपुरचे उपसरपंच प्रकाश खर्डे, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक श्रीकांत खर्डे, स्वप्निल निबे, धनंजय दळे, आबा खर्डे,ऋषिकेश खांदे,शरद खर्डे, श्याम गोसावी, राहुल खर्डे विकी पाटोळे, नारायण पगारे, राजेंद्र राऊत, किशोर निबे, गणेश राका, विजय डेंगळे, किरण खर्डे,विकी डंक, ऋषिकेश आंबरे, कार्तिक पगारे, साईराज खर्डे, पत्रकार बांधव ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाची वाटप करतात करण्यात आले.