22.1 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे; डॉ. सुजय विखे पाटील ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या जागेवर रहिवाशांसाठी अर्धा गुंठा जमीन वाटून त्यांच्या नावे घरकुल बांधले जाणार आहे.

या अनुषंगाने भीमनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उर्वरित जागेत अंगणवाडी करण्यात येणार असून, त्या परिसरात सार्वजनिक शौचालय, नाल्या, काँक्रीट रस्ते, पाणीपुरवठा योजना, विद्युत डीपी, सौरदिवे अशा मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. “विकासकामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही. आणि जेव्हा ही घरे पूर्ण होतील, तेव्हा मी प्रत्येक कुटुंबासोबत बसून जेवायला येईन,असे भावनिक उद्गार डॉ. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

लोणी खुर्द गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांसाठी मंजूर ८ कोटींच्या निधीतून अनेक कामांचे भूमिपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कामांमध्ये शौचालय बांधणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सांडपाणी गटार व्यवस्था, पाझर तलाव दुरुस्ती, रस्ता मजबुतीकरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, वॉल कंपाऊंड उभारणी, पाणी फिल्टरेशन प्लांट बसविणे, तसेच बंदिस्त गटार यांचा समावेश आहे.

याच कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यात १२ ते १६ दरम्यान लोणी खुर्द येथे आयोजित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या निर्णायक विकास टप्प्याचे स्वागत करत डॉ. सुजय विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!