23.7 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

साईबाबांनी याप्रमाणे इच्छापूर्ती केल्यास साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी लोणी ते शिर्डी पायी चालत येणार – डॉ. सुजय विखे पाटील

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपरिषदे साठी अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी बांधवांसाठी नगराध्यक्ष पदाची सोडत निघावी याकरिता आपण साईबाबांना साकडे घातले असून साईबाबांनी याप्रमाणे इच्छापूर्ती केल्यास साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी लोणी ते शिर्डी पायी चालत येणार असल्याचे सुतोवाच माजी खासदार युवा नेते डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केले आहे.

जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या एक कोटी 16 लाख रुपये खर्चाचे व १००० मॅट्रिक टन साठवून क्षमतेच्या नवीन गोदामाची पायाभरणी माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ शिर्डी विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू गोंदकर शिर्डी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोणते माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके डॉ एकनाथ गोंदकर सुधाकर शिंदे शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हॉइस चेअरमन बाळासाहेब काटकर संचालक प्रमोद गोंदकर विजय ज्ञानेश्वर गोंदकर तान्हाजी आप्पासाहेब गोंदकर विकास होते विजय गायकवाड सौ सुनीता कोते विलास सभा होते बाळासाहेब जगताप नितीन होते किरण होते श्रीमती प्रमिला शेळके तज्ञ संचालक आप्पासाहेब तुकाराम होते रवींद्र कोते सचिव संदीप बढे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते .

याप्रसंगी बोलताना  डॉ सुजय दादा विखे पाटील म्हणाले कोणतीही सहकारी संस्था म्हटल की गट तट नाराजी मतभेद विरोध असतोच अनेक तांत्रिक अडचणी असतात त्या पदासंदर्भात असतात याचा अनुभव आम्हाला आहे मात्र साईबाबांच्या कृपेने सर्वांचा नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील परिवारार विश्वास आहे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य विखे पाटील परिवाराकडे आहे आगामी अडीच अडीच महिन्याच्या दरम्यान येऊन ठेपलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यक्ती नगराध्यक्ष पदाचे दावेदार समजतात आमचे भाग्य आहे आमच्याकडे प्रत्येक नेता नागराध्यक्ष पदाच्या ताकदीचा आहे असे असले तरी शिर्डी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदाची सोडत ही अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी समाज बांधवांसाठी निघावी अशी प्रार्थना साईबाबांकडे केली असून साईबाबांना तसेच साकडे घातले आहे बाबांनी ही इच्छा पूर्ण केल्यास मी स्वतः लोणी ते शिर्डी पायी चालत साई दर्शनासाठी येणार आहे.

त्यावेळी सर्व पदाधिकारी नागरिक या निर्णयाचे स्वागत करतील असा मला विश्वास आहे सर्वसामान्य आदिवासी बांधवांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली पाहिजे त्यांच्या हातून सुद्धा विकास साध्य करता आला पाहिजे याकरिता ही माझी भूमिका आहे शिर्डीचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे मात्र आपल्या महिला मुली भगिनी या सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच शिर्डीचा योग्य पद्धतीने विकास साध्य करण्याकरिता आपण योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे विरोधक पॅनल उभे करतील त्यात हरकत नाही मात्र डॉ एकनाथ गोंदकर असो किंवा विरोधी पक्षातील इतर मान्यवर यांनी शिर्डीच्या विकासाला कधीही विरोध केला नाही अथवा अडकाठी निर्माण केली नाही ही बाब कौतुकास्पद आहे सुरक्षित व गुन्हेगारी मुक्त शिर्डी निर्माण करणे हे माझं ध्येय व उद्दिष्ट असून याकरिता मला आपणा सर्वांची साथ लागणार आहे कुठल्याही वाईट प्रवृत्तीला छोट्याशा आर्थिक स्वार्थासाठी स्थान देऊ नका आर्थिक फायद्यासाठी अपप्रवृत्तींना डोक्यावर बसवून घेऊ नका शिर्डीचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी विखे पाटील परिवार कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू गोंदकर यांनी केले सूत्रसंचलन सोसायटीचे संचालक प्रमोद काका गोंदकर यांनी तर आभार प्रदर्शन संचालक विलास सभापती यांनी केले यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते अभय शेळके डॉ एकनाथ गोंदकर एन सी सी एफ चे प्रतिनिधी किशोर महाले आदींनी आपले विचार व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!